Video: पठ्ठ्याने रस्त्यातंच टाकली खुर्ची, पेग मारला अन् झाला तर्राट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video: पठ्ठ्याने रस्त्यातंच टाकली खुर्ची, पेग मारला अन् झाला तर्राट

ज्या लोकांना दारू पिण्याचा नाद असतो त्यांचा नाद करू नये असं म्हणतात. तर ते कोणत्या क्षणी काय करतील त्याचा नेम नसतो. तर अशाच एका दारूड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. रस्त्यावर दारू पिऊन तर्राट होणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

(Man drinking alcohol in middle of road Video viral)

हेही वाचा - मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा मध्यप्रदेशमधील ग्वालियार येथील असल्याचं समोर आलं असून एक व्यक्ती रस्त्यावर बसून दारू पिताना दिसत आहे. एक व्यक्ती त्याला पेग भरण्यास मदत करत असून तो पिऊन झाल्यावर रस्त्यावरंच झोपलेला दिसत आहे. तर रस्त्याने जाणाऱ्या गाड्या त्याच्या आजूबाजून जात आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.