Viral : पठ्ठ्या 3 पाळीव मांजरांना घेऊन गेला कॉफी डेटवर; पुढे काय झालं पाहा Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dating

Viral : पठ्ठ्या 3 पाळीव मांजरांना घेऊन गेला कॉफी डेटवर; पुढे काय झालं पाहा Video

काही लोकं प्राण्यावर एवढा जीव लावतात की ते त्यांचा जीव की प्राण असतात. त्यांना खायला, प्यायला, फिरायला घेऊन जाणं असो किंवा त्यांना वेगवेगळ्या फॅशनचे कपडे घालणे असो. पाळीव प्राण्यांचे सर्व लाड पुरवत असतात. तर असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

व्हायरल होत असलेला व्हिडिओ प्राथमिक दृष्ट्या परदेशातील असल्याचं दिसत असून एक व्यक्ती आपल्या तीन पाळीव मांजरांसोबत कॉफी डेटवर आला आहे. तो त्यांना ब्रेड पॅटीस, कॉफी पाजताना दिसत आहे. तर तीनही मांजरं बाबागाडीत टाकून सदर व्यक्तीने आणले असून थोड्यावेळाने तिनही मांजरे झोपलेले व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेक युजर्सनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जवळपास २ हजार नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपलं मत व्यक्त केलंय.

टॅग्स :CatDatingviral video