
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह चालत्या रुग्णवाहिकेतून गोंडा-लखनऊ महामार्गावर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव हृदय लाल असल्याचे समजते. ही घटना सोमवारी घडली असून, कुटुंबीयांनी निषेध म्हणून रस्ता अडवण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आरोप आहे.