Man Sleep With Anaconda Snake : आपल्यापैकी अनेकांना पाळीव प्राण्याचा लळा असतो, कुणी श्वान पाळतो, कुणी मांजर पाळतं, तर कुणी पोपट. पण एखाद्याने चक्क अॅनाकोंडाच पाळला तर? हे ऐकून आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. अमेरिकेतल्या एका व्यक्तीने चक्क अॅनाकोंडा पाळला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.