
तो झोपला होता, 3 चित्ते आले अन् त्याच्या शेजारीच झोपी गेले; Video पाहून झोप उडेल
चित्ता किंवा बिबट्याचं नाव ऐकलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. प्रत्यक्षात जर बिबट्या समोर आला तर आपली पळती भुई थोडी होईल. पण एखाद्याच्या शेजारी बिबट्या झोपलेला आपण कधी पाहिलंय का? हे ऐकूनही आपल्याला विश्वास बसणार नाही. पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती झोपलेला आपल्याला दिसत आहे. तर त्याच्या शेजारी तीन चित्तेही झोपले आहेत. एक चित्ता उठून त्याच्या अंथरूणात जातो आणि त्या व्यक्तीच्या कुशीत झोपतो. हे पाहून आपली झोप उडेल पण हे चित्ते सदर व्यक्तीने पाळले आहेत. जगातील काही देशांत प्राण्यांना वापर पाळीव प्राणी म्हणून करू शकतो.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.