Viral Video : बुरखा घालून 'आली' अन् नवरदेवाला नवरीसमोरंच मारली मिठी; जाणून घ्या प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

VIdeo

Viral Video : बुरखा घालून 'आली' अन् नवरदेवाला नवरीसमोरंच मारली मिठी; जाणून घ्या प्रकरण

एका लग्नात एका बुरखा घातलेल्या व्यक्तीने स्टेजवरंच मिठी मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या स्टेजवर नवरदेवाबरोबर नवरीही आहे. पण तिच्यासमोरंच नवरदेवाला मिठी मारल्यामुळे स्टेजवरील आणि पाहुणे मंडळी आवाक् झाले असून हा व्हिडिओ सध्या चांगलाच शेअर केला जात आहे.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एका लग्न समारंभातील असून त्यामध्ये नवरदेवाचा एक मित्र बुरखा घालून येतो आणि नवरदेव असलेल्या आपल्या मित्राला मिठी मारतो. तर त्याला पाहून नवरीलाही हसू आवरत नाही. त्यानंतर बऱ्याच वेळाने त्याने मिठी सोडली अन् दोघेही हसू लागतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: Photo : चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरण पेटलं; भाजपविरोधात पिंपरीत आंदोलन

दरम्यान, आपल्या मित्रासोबत अनेकवेळा असे प्रॅन्क केले जात असतात. काहीजण वेगवेगळ्या प्रकारे मित्राला सरप्राईज देत असतात. तर हा व्हिडिओवर अनेक नेटकऱ्या्ंनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. जवळपास ८० हजार युजर्सने हा व्हिडिओ लाईक केला आहे.

टॅग्स :marriageviral video