
NCP Song In Russia : रशियन विद्यापीठात घुमलं 'राष्ट्रवादी पुन्हा'; तरुणांचा थिरकतानाचा Video Viral
देशातील अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात, घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा खूप दिवस घरी परतता येत नाही. सणांच्या दिवसातही शिक्षण आणि तिकीटांचे न परवडणारे दर यामुळे विद्यार्थी घरापासून दूर सण साजरा करतात. असाच एक परदेशात जल्लोषात सुरू असलेल्या होळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
मागील काही दिवसात होळीची धूम सगळीकडे पाहायला मिळाली, यानंतर आता महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांचा होळी सेलिब्रेशन दरम्यान राष्ट्रवादी पुन्हा या गाण्यावर नाचतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वोल्गोग्राड राज्य वैद्यकीय विद्यापीठ, रशिया येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा असल्याचे सांगितले जात आहे.
वैद्यकिय शिक्षणासाठी देशातील तसेच महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी रशियात जातात. दरम्यान शिक्षणासाठी रशियाला गेलेल्या विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ होळी सेलिब्रेशन दरम्यानचा आहे. यामध्ये डीजेच्या तालावर अनेक तरुण नाचताना दिसत आहेत. मात्र यावेळी वाजतंय ते गाणं चर्चेचा विषय ठरलं आहे. ज्ञानेश्वर अखाडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओतील तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रचार गीत राष्ट्रवादी पुन्हा या गाण्यावर नाचत आहेत. रशिया येथे भारतीय विद्यार्थ्यांनी होळीच्या रंगात अजूनही रंग भरला... जेव्हा वाजलं रशियाच्या वैद्यकीय विद्यापीठात राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं..! असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.