Police Dance Video : सुनो गौर से दुनियावालो! हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर पोलिसाचा धडाकेबाज डान्स

Video Viral
Video ViralSakal

मेरठ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सगळा देश उत्साहात आहे. उद्या आपण देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. त्यानिमित्ताने केंद्र सरकारने हर घर तिरंगा आणि तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. तिरंगा रॅलीदरम्यान डान्स करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तरप्रदेशमधील मेरठ येथील आहे. तिरंगा रॅलीमध्ये पोलिस कर्मचारी आणि वेगवेगळे जवान सहभागी झाले होते. यावेळी देशभक्तीपर गीतावर अनिल यादव या पोलिस अधिकाऱ्याने भन्नाट डान्स केला आहे. "सुनो गौर से दुनियावालो बुरी नजर ना हम पे डालो" या प्रसिद्ध गाण्यावर त्यांनी रॅलीमध्येच भन्नाट डान्स केला आहे.

Video Viral
Video Viral : 'ट्रीपल सीट बसू नका, हेल्मेट घाल रे!' सिग्नलवर घुमला कंट्रोल रूमचा आवाज; नाशिक पोलिसांची भन्नाट कल्पना

दरम्यान, हा डान्स पाहून स्थानिकांनी त्यांच्या गळ्यात फुलाचे हार घालून स्वागत केले आहे. थोड्या वेळातच त्यांच्या गळ्यात फुलांच्या हाराचा मोठा गुच्छ जमा झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगलीच पसंती दर्शवली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com