
Nikah Dowry Viral Video : मेरठमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका भव्य विवाह समारंभाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या लग्नात श्रीमंतीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. या निकाह समारंभात वधूपक्षाने वरपक्षाला दिलेल्या महागड्या भेटवस्तू आणि रोख रकमेचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
राष्ट्रीय महामार्ग ५८ वरील एका आलिशान रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. समारंभादरम्यान वधूपक्षाने वरपक्षाला २.५ कोटी रुपयांची रोख रक्कम सुपूर्द केली. या व्हिडीओत अनेक पुरुष सूटकेसमध्ये भरलेली रोख रक्कम हाताळताना दिसत आहेत. वधूपक्षाने वरासाठी ७५ लाख रुपयांची आलिशान कार खरेदीसाठी दिल्याचीही घोषणा या समारंभात करण्यात आली.
समारंभात निकाहचे विधी पार पाडणाऱ्या मौलानालाही ११ लाख रुपयांची भेट देण्यात आली. याशिवाय वधूपक्षाने गाझियाबादमधील एका मशिदीसाठी ८ लाख रुपयांची देणगी दिली. लग्नातील प्रथेनुसार वधूच्या बहिणींनी बूट चोरल्याबद्दल वरपक्षाकडून ११ लाख रुपये घेतले.
हा विवाहसोहळा भव्य असूनही कुटुंबीयांनी उपस्थित पाहुण्यांना फोटो किंवा व्हिडीओ घेण्यास मनाई केली होती. मात्र, एका पाहुण्याने चोरीछुपे व्हिडीओ रेकॉर्ड केला. जेव्हा तो व्यक्ती रेकॉर्डिंग करताना आढळला, तेव्हा त्याला लगेच थांबवण्यात आले.
हा व्हिडीओ शेअर करताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने या प्रथांवर टीका केली आहे. "शाही विवाहसोहळ्यात २.५६ कोटींची अशी उधळण, ११ लाखांची जूता चुराई, ८ लाखांची मशिदीसाठी देणगी दिली जाते. पण यामुळे गरीब मुलींची लग्ने होण्यास अडथळा निर्माण होतो," अशी प्रतिक्रिया या वापरकर्त्याने दिली.
भारतातील अशा भव्य विवाहसोहळ्यांमुळे हुंड्याची प्रथा अधिक गडद होताना दिसते. यामुळे अनेक गरीब कुटुंबे आपल्या मुलींचे लग्न लावण्यात असमर्थ ठरतात. समाजातील अशा रुढी-परंपरांविरोधात जनजागृती करणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.