Viral Video : मुझे फरक नहीं पडता..! २४ वर्षांच्या पोरीचा जन्मदात्या पित्याशी हिंदू पद्धतीने विवाह, पाहा धक्कादायक व्हिडिओ

Shocking viral video father daughter marriage : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एका २४ वर्षीय तरुणीने आपल्याच ५० वर्षीय वडिलांना पती म्हणून ओळख करून दिली आहे.
Shocking viral video father daughter marriage
viral video father daughter marriage in templeesakal
Updated on

Father daughter marriage viral video India : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एका २४ वर्षीय तरुणीने आपल्याच ५० वर्षीय वडिलांना पती म्हणून ओळख करून दिली आहे. याव्यतिरिक्त, या दोघांनी मंदिरात पारंपरिक पद्धतीने विवाह केला असल्याचा दावा केला आहे. या प्रकाराने सामाजिक बंधनं आणि नातेसंबंधांविषयी मोठ्या वादाला तोंड फोडलं आहे.

"हे माझे वडील आहेत आणि आम्ही लग्न केल्यानंतर आनंदी आहोत," असे स्पष्ट वक्तव्य या तरुणीने व्हिडिओमध्ये केले आहे. तिच्या शेजारी उभ्या असलेल्या वडिलांनीही या नात्याला दुजोरा देत, "होय, ती माझी मुलगी आहे. यात काही चुकीचे आहे का?" असा प्रतिप्रश्न केला.

व्हिडिओमध्ये एका प्रेक्षकाने विचारलेल्या लज्जेसंबंधीच्या प्रश्नावर या वडिलांनी संतापाने उत्तर दिलं, "तुम्ही कोणत्या युगात जगता? लाज का वाटावी?"

Shocking viral video father daughter marriage
Viral Video : "गेला उडत..!" दुभाजकाला धडकून स्कूटर चालक बनला सुपरमॅन, अपघातानंतर काय घडलं? व्हिडिओमध्ये बघाच

व्हिडिओमागची कारणमीमांसा

या विचित्र घटनाक्रमामागे या जोडप्याची भूमिका अशी आहे की, त्यांच्याविषयी होत असलेल्या चर्चा आणि अफवांना उत्तर देण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ बनवला आहे. "आमच्या मागे बोलणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठीच आम्ही हे लग्न केलं आहे," असं या मुलीनं म्हटलं आहे.

हा व्हिडिओ समाजवादी पक्षाचे जयसिंह यादव यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. लाखो लोकांनी तो पाहिला असून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. हा व्हिडिओ मूळतः २०२० पूर्वी टिकटॉकवर अपलोड केला गेला होता, मात्र सध्या टिकटॉकवर बंदी असल्याने त्याची सत्यता पडताळणं कठीण आहे.

Shocking viral video father daughter marriage
Viral Video : बापरे! रील बनवण्याच्या नादात विषारी सापाला गळ्यात घातलं अन् नरड्याला वेटोळा बसताच लहान मुलाचा जीव...पाहा धक्कादायक व्हिडिओ

सामाजिक आणि कायदेशीर वाद

या व्हिडिओवर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींनी हा प्रकार मनोरंजनासाठी बनवलेला फेक व्हिडिओ असल्याचा दावा केला आहे, तर काहींनी याला नैतिकतेचं उल्लंघन ठरवलं आहे.

काही नेटकऱ्यांनी याविषयीच्या कायदेशीर बाबी अधोरेखित केल्या आहेत. हिंदू विवाह कायद्यानुसार, वडील-मुलीचं नातं पवित्र मानलं जातं, आणि अशा प्रकारचं लग्न अनैतिक व बेकायदेशीर ठरतं. परिणामी, हे लग्न अवैध ठरवण्यात येऊ शकतं. एका युजरने लिहिलं, "अशा लोकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालायला हवी."

हा व्हिडिओ खरा असेल किंवा फेक, परंतु त्यावरून सुरू झालेल्या चर्चांनी समाजातील नातेसंबंधांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.

Shocking viral video father daughter marriage
Elon Musk Mars Mission : इलॉन मस्कचं यान 90 दिवसांत मंगळावर पोहोचणार, काय आहे नवा प्लॅन? पाहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com