सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ असे असतात की, ते पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरते. गेल्या काही दिवसापूर्वी एका हॉटेलमधील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये हॉटेलमधील कर्मचारी गोळा केलेला कचरा चक्क तयार होत असलेल्या पदार्थामध्ये टाकतो. त्या व्हिडिओनंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. दरम्यान हे प्रकरण संपत नाही तोपर्यंत दुसरी घटना समोर आली आहे.