मंदिरात चोरीच्या संशयावरुन कुटुंबाला जमावाकडून बेदम मारहाण; हल्ल्यात चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

पुडुकोट्टाई जिल्ह्यातून (Tamil Nadu Pudukottai) अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलीय.
Tamil Nadu Pudukottai
Tamil Nadu Pudukottaiesakal
Summary

पुडुकोट्टाई जिल्ह्यातून (Tamil Nadu Pudukottai) अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलीय.

तामिळनाडूच्या पुडुकोट्टाई जिल्ह्यातून (Tamil Nadu Pudukottai) अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलीय. इथं गावकऱ्यांच्या जमावानं सहा जणांच्या कुटुंबाचा पाठलाग करून त्यांना बेदम मारहाण केलीय. जमावानं केलेल्या हल्ल्यात कुटुंबातील अवघ्या 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय.

गावकऱ्यांनी या कुटुंबावर मंदिरातून वस्तू चोरल्याचा आरोप केलाय. जमावानं कुटुंबाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 14 नोव्हेंबरला तामिळनाडूच्या पुडुकोट्टाई जिल्ह्यातील किल्लानूर गावाजवळ मंदिरात चोरी करत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर जमावानं या कुटुंबावर पाळत ठेवली. यानंतर सहा लोकांचं कुटुंब ऑटोरिक्षातून (Autorickshaw) प्रवास करताना दिसल्यावर, गावकऱ्यांच्या टोळीनं ते दरोडेखोर असल्याचा दावा करत वाहनाचा पाठलाग सुरू केला.

Tamil Nadu Pudukottai
Political News : आता पुन्हा मिठ्या मारणं, पप्प्या घेणं सुरु होईल; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक टोमणा

या जमावानं ऑटोरिक्षाला घेराव घातला आणि माचुवाडीजवळ थांबवून कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कुड्डालोर येथील कुटुंबाची सुटका केली. या हल्ल्यात 10 वर्षाच्या करपगंबिकाला देखील मारहाण करण्यात आली. ती कुटुंबासोबत तिथं उभी असताना तिच्यावर जमावानं हल्ला केला. या कुटुंबाला पुडुकोट्टाई सरकारी रुग्णालयात (Pudukottai government hospital) दाखल करण्यात आलं असून गंभीर जखमी झालेल्या मुलीचा 16 नोव्हेंबरला संध्याकाळी मृत्यू झाला.

मुलीची आई लिली पुष्पा यांनी आता गणेश नगर पोलिसांकडं तक्रार दाखल केलीय. तिनं तक्रारीत म्हटलंय, आम्ही कुटुंबासह दोन महिन्यांपूर्वी एका ऑटोरिक्षानं कुड्डालोरला अनेक मंदिरांना भेट देण्यासाठी निघालो होतो. दरम्यान, 14 नोव्हेंबरला किल्लानूरजवळ तिघांनी आमच्याशी भांडण केलं. त्यानंतर पती सत्यनारायणसामी यांनी मध्यस्थी केल्यावर त्यांनी आमच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. या गटानं पाठलाग सुरू केल्याचंही तिनं सांगितलं. दरम्यान, कुटुंबानं चोरलेल्या वस्तूंचा आणखी एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. याचं गावकऱ्यांनी चित्रीकरण केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com