Video Viral: माकडाचा 'नशापाणी'; पितंय चक्क पेट्रोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Video: माकडाचा 'नशापाणी'; पितंय चक्क पेट्रोल

एखाद्या व्यक्तीला दारूचे, सिगारेटचे व्यसन असलेलं आपण ऐकलं असेल. कधीकधी लहान वयातंय व्यसन लागलेलंही ऐकलं असेल. हद्दच झाली तर कोंबड्याला दारूचं व्यसन लागलेल्या बातम्या आपण कधी पाहिल्या असतील पण एखाद्याला पेट्रोलचं व्यसन कसं असू शकतं? हो हे खरंय. तेही व्यक्तीला नाही तर एका माकडाला पेट्रोलचं व्यसन लागलंय.

(Monkey Drink Petrol Viral Video)

माकडाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका पेट्रोल पंपावरील हा व्हिडिओ असून एका गाडीवर बसून हे माकड गाडीतील पेट्रोल पित असताना दिसत आहे. तर जवळ असलेले गाडीवरील लोकं फक्त त्याच्याकडे बघत आहेत. काहीजण माकडाला भीत आहेत. त्यामुळे त्याला लांब लावण्याची कुणाची हिंमत होत नाही.

गाडीच्या टाकीत हात टाकून हे माकड पेट्रोल पीत आहे तर हे त्याला लागलेलं व्यसन आहे असं नेटकरी सांगत आहेत. तर असे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओला शेअर केलंय.

टॅग्स :petrolMonkeyviral video