Snake Monkey Viral Video: फना काढून बसलेल्या नागाला पाहून माकडानं असं काही केलं की तुम्हीही पाहून थक्क व्हाल!

Monkey's Unexpected Reaction : सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे, या काळात भगवान शंकराची आराधना करण्यास विशेष महत्त्व असते.
A monkey fearlessly engages with a hooded cobra—this astonishing moment was captured in a viral video that shocked the internet.
A monkey fearlessly engages with a hooded cobra—this astonishing moment was captured in a viral video that shocked the internet. esakal
Updated on

animal viral video: सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे, या काळात भगवान शंकराची आराधना करण्यास विशेष महत्त्व असते. सोमवारी तर भगवान शंकराच्या मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. तर भगवान शिवाच्या गळ्यात असणाऱ्या नागाचाही सण नागपंचमी याच महिन्यात असतो. या दिवशी श्रद्धाळू लोक नागाची पूजा करतात, त्याला दूध देतात.. आता याच दिवसांतील एक व्हिडिओ समोर आला आहे, जो चर्चेच विषय ठरत आहे.

या व्हिडिओ मध्ये एक माकड आणि नाग दिसत आहेत. परंतु या व्हिडिओत माकडाने जे काही केलं ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. खरंतर हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्यामुळे याची पुष्टी केली जात नाही.

नाग समोर फना काढून बसलेला पाहून.. माकडाने आधी त्याच्यासमोर डोकं टेकवलं त्यानंतर त्याने त्या नागाला एका हाताने ओढून आपल्या डोक्यावर ठेवलं. विशेष म्हणजे यावेळी तो नागही अगदी शांतपणे माकडाच्या खांद्यावर थांबलेला या व्हिडिओत दिसत आहे. माकड आणि नागाचा हा व्हिडिओ आता चर्चेत आला आहे.

A monkey fearlessly engages with a hooded cobra—this astonishing moment was captured in a viral video that shocked the internet.
Arvind Sawant Criticism PM Modi : ''...तर आम्ही मोदींना डोक्यावर घेवून नाचलो असतो'' ; अरविंद सावंतांचं लोकसभेत मोठं विधान!

श्रद्धाळू लोक या व्हिडिओला एक लीला म्हणून बघत आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ सोशलही केला आहे. काहींनी या व्हिडिओसोबत जय भोलेनाथ, जय बजरंगबली असे लिहिले आहे. लोक या व्हायर व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. तर काहींना हा व्हिडिओ बनावट असल्याचंही म्हटलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com