
इथे सापांचे एक संपूर्ण कुटुंब आहे. एका घराच्या शौचालयाच्या टाकीत ७० हून अधिक साप एकत्र दिसल्याने गोंधळ उडाला. यामुळे लोक घाबरल्याचे पाहायला मिळाले आहे. वन विभागाच्या पथकाला कळवण्यात आले. परंतु कोणीही कर्मचारी मदतीसाठी आला नाही. यानंतर स्थानिक लोकांनी स्वतः सापांना पकडून जंगलात सोडले. ही घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील आहे. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.