Viral Video Sparks Debate
esakal
आपल्या मुलांनी लग्न करावं आणि सुखी आयुष्य जगावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. मात्र, एक अशी आई आहे जिला आपल्या मुलींने विवाह करू नये असं वाटतं आहे. त्यासाठी ती मुलींना चक्क पैसे द्यायला तयार आहे. या महिलेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडीओत ही महिला आपल्या मुलींना विवाह न करण्याचे अटीवर ३५ हजार डॉलर म्हणजेच जवळपास २९ लाख रुपये देण्याचं आश्वासन देते आहे.