
मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील सागौरिया गावात एका मंदिराजवळ खणकामादरम्यान मजुरांना ४५ चांदीची नाणी सापडली आहेत. या नाण्यांवर उर्दू आणि फारसी भाषेत अक्षरे कोरलेली असून, हा खजिना मुघल काळातील असण्याची शक्यता आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, प्रशासनाने नाणी जप्त करून तपासणी सुरू केली आहे.