Fri, March 31, 2023

Viral Video : अंतर्वस्त्र अन् चपलांमध्ये लपवलं दीड कोटी रूपयांचं 3Kg सोनं; ठोकल्या बेड्या
Published on : 14 March 2023, 10:54 am
मुंबईमध्ये एका परदेशी प्रवाशाने आपल्या चपलांमध्ये तब्बल दीड कोटी रूपयांचं सोनं लपवल्याची बाब उघड झाली आहे. चप्पल आणि कपड्यांमध्येही सोनं लपवलं असून या प्रवाशांना सीमा शुल्क विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, मुंबई येथील विमानतळावर ही घटना घडली आहे. सीमाशुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इथिओपिया इथून आलेल्या प्रवाशाच्या चपलांमधून सुमारे दीड करोड रुपयांचं तब्बल तीन किलो सोनं मुंबई कस्टम्सने जप्त केलं आले. हे सोन चपला तसेच अंतर्वस्त्रामध्ये लपवण्यात आलं होतं.
सीमाशुल्क विभागाने ऑन कॅमेरा ही कारवाई केली असून चप्पलेच्या सोल मधून काही वस्तू बाहेर काढताना या व्हिडिओत दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.