
मुंबईच्या गजबजलेल्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात एका रिक्षाचालकाने आपल्या अनोख्या व्यवसायाने सर्वांचे लक्ष वेधले होते. अमेरिकन वाणिज्य दूतावासाजवळ (यूएस कॉन्सुलेट) बॅग ठेवण्याची सुविधा देऊन हा रिक्षाचालक दरमहा ५ ते ८ लाख रुपये कमावत होता. पण, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या यशोगाथेचा अचानक अंत झाला. कायद्याच्या कचाट्यात सापडून त्याचा व्यवसाय बंद पडला आहे.