मुंबईत भररस्त्यात 'हॅटमॅन'कडून महिलेचा खून; Viral Videoवर पोलिसांचे स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

मुंबईत भररस्त्यात 'हॅटमॅन'कडून महिलेचा खून; Viral Videoवर पोलिसांचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईत एका हॅट घातलेल्या व्यक्तीकडून भररस्त्यात महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना अंधेरी येथे घडली असल्याची चर्चा असून यावर पोलिसांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. अशी कोणतीही खूनाची घटना घडली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

(Mumbai Crime women murder on road viral video)

याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही तर अशी कोणतीही घटना या ठिकाणी घडली नाही असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर #HatmanKillerinMumbai असा हॅशटॅग ट्रेंड झाला. तर पोलिसांनी ही घटना घडली नसल्याचं सांगितलं आहे.

काय आहे व्हिडिओत?

एक महिला एका कारमधून उतरते आणि कार निघून जाते. त्यानंतर एक काळा कोट, पँट आणि हॅट घातलेला व्यक्ती मागून येतो आणि त्या महिलेवर चाकूने वार करतो. ती महिला खाली पडल्यानंतर तो तिच्या पायाला धरत बाजूला ओढून नेताना दिसत आहे. त्याचबरोबर रस्त्यावर रक्त सांडलेलंही दिसत आहे.