
मुंबई लोकल ट्रेनने दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. कधी कधी तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा ठप्प होते तेव्हा चाकरमान्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो. पण मुंबईतील माहीम रेल्वे स्थानकात विचित्र कारणामुळे लोकल सेवा काही काळ ठप्प झाली. एका व्यक्तीने रुळावर येऊन असे कृत्य केले की त्यामुळे रेल्वे वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.