
मुंबईच्या मध्य रेल्वेच्या गर्दीच्या डब्यात सीटवरून सुरू झालेल्या किरकोळ वादाने मराठी-हिंदी भाषिक वादाचे स्वरूप धारण केले. या घटनेचा 17 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे राज्यातील भाषिक वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. व्हिडिओत एक महिला दुसऱ्या गटाला उद्देशून म्हणते, "मुंबईत राहायचे असेल तर मराठी बोला, नाहीतर बाहेर जा."