
मुंबईच्या मलाड येथील मालवणी परिसरात एका धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एका व्यक्तीने चक्क ९ व्या मजल्यावरून एका निरागस मांजरीला खाली फेकल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या क्रूर कृत्याने नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.