Viral : मुंबईत महिलेचा नग्न संचार; Photo आले समोर, दोघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral

Viral : मुंबईत महिलेचा नग्न संचार; Photo आले समोर, दोघांवर गुन्हा

मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ येथील निवासी संकुलातील सार्वजनिक ठिकाणी असभ्य प्रदर्शन केल्याप्रकरणी घरमालक आणि एका महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात सदर महिला इमारतीच्या आवारात कपडे न घालता फिरताना आढळली होती.

हेही वाचा - वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

या प्रकाराचा फोटो समोर आला असून सांताक्रूझ येथील एका इमारतीमध्ये हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. घरमालकाकडे आलेल्या महिला पाहुणीने हे कृत्य केले आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली होती. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, ही महिला नग्न अवस्थेत फिरत असतानाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर सध्या हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे.