Viral Video : पुंगी वाजवताच फणा काढत बाहेर आला नाग अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : पुंगी वाजवताच फणा काढत बाहेर आला नाग अन्...

सोशल मीडियावर अनेक मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये डान्स आणि विनोदी व्हिडिओ असतात. अशाच एका नागीन डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक पुंगी वाजवणारा व्यक्ती पुंगी वाजवत असताना एक नागोबा बाहेर आला आणि पुंगी वाजवणाऱ्याची पुंगी वाजवली.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक पुंगी वाजवणारा व्यक्ती एका दुकानासमोर पुंगी वाजवत आहे. तर ते सुरू असताना दुकानातून एक मुलगा डान्स करत बाहेर येतो. त्याचा नागीन डान्स पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. त्यानंतर जे घडले ते पाहण्यासारखं आहे.

हेही वाचा: Viral Video : गेंडा पर्यटकांच्या गाडीमागे जोरात पळाला अन् क्षणात...

पुंगी वाजवणे सुरू असताना डान्स करणारा मुलगा त्याच्या मागे पळतो आणि सापाने फणा काढल्यासारखा त्याच्यावर फुत्कारतो. त्यानंतर पुंगी वाजवणाऱ्याची पळता भुई थोडी होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :danceviral video