
Viral Video
नाशिकमधील गोदावरी नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे रामकुंड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गंगापूर धरणातून 4,656 क्युसिक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने रामकुंड आणि आजूबाजूचा परिसर पाण्याखाली गेला आहे. याच दरम्यान, एका तरुणाच्या थरारक सुटकेची घटना घडली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.