

Nepal flood rescue video: A buffalo carries a stranded man through strong floodwaters toward a safer location.
esakal
Nepal Flood Buffalo Rescues Stranded Man : नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या विनाशकारी पुरामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि पाण्याचा भलामोठा प्रवाह माणसांपासून ते मोठ्या इमारतींपर्यंत सर्व काही वाहून नेत आहे. या विनाशाच्या आणि गोंधळाच्या वातावरणात, सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक आणि हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये एक तरुण दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या पुरात अडकलेला दिसतो; मात्र, त्याला वाचवण्यासाठी मानवी बचाव पथक आले नाही, तर एका म्हशीने देवदूता सारखी भूमिका बजावली आणि त्याचा जीव वाचवला