Viral Video : ...अन् बघता बघता साडी नेसलेल्या आज्जीने नदीत मारला सूर; तरूणालाही लाजवेल

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही पोहण्याची इच्छा होईल.
Viral Video
Viral VideoSakal
Updated on

सोशल मीडियावर अनेक मजेशीर आणि गंमतीदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असतात तर काही व्हिडिओ आपल्याला प्रेरणा देत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक महिला पाण्यामध्ये उडी मारताना दिसत आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला असून, "तामिळनाडूतील कल्लीडायकुरिची येथे तामीराबर्णी नदीत सहजतेने मारत असलेल्या या साडी नेसलेल्या ज्येष्ठ महिलांना पाहून आश्चर्य वाटले. त्या सारख्या पोहत असतात. कारण त्या पोहण्यात पारंगत आहेत असं मला सांगण्यात आलं" असं त्यांनी या व्हिडिओवर लिहिलं आहे.

दरम्यान, या महिलेने अशी उडी मारली आहे की ते पाहून तरूणही लाजतील. कारण अनेक तरूणांना अशा नदीत किंवा तलावात पोहण्याची भिती वाटते. तर ही महिला सफाईदारपणे न भिती उडी मारते. हा प्रेरणादायी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.