Viral Video : म्हातारा थिरकला तरुणीच्या तालावर, चक्क उचलूनही घेतलं; तरूणांना लाजवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dance

Viral Video : म्हातारा थिरकला तरुणीच्या तालावर, चक्क उचलूनही घेतलं; तरूणांना लाजवलं

आपल्या आवडीसाठी कोणत्याही अडचणींवर मात करता येऊ शकते किंवा आवडीनिवडी जोपासण्यासाठी वयाची अट नसावी असं म्हणतात. तर त्याचप्रमाणे एका म्हाताऱ्या व्यक्तीचा तरूणीसोबतच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या वृद्धाचा सफाईदार डान्सचा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

(Old Man And Girl Dance Viral Video)

दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका पार्टीतील असल्याचं समजतंय. तर ही तरूणी आणि म्हातारा व्यक्ती डान्स करत आहेत. म्हातारा व्यक्ती आपले वय विसरून एवढा सफाईदारपणे डान्स करत आहे की त्याचा डान्स पाहून त्याचे वय ८० च्या आसपास असेल असा विचारही आपल्या मनात येणार नाही. या वृद्धाने आपल्या डान्सने चक्क तरूणांनाही लाजवलं आहे.

तो मध्येच तिला उचलूनही घेत असल्याने सगळेजण चकित झाले आहेत. तर या व्यक्तीचा जोश तरूणांना किंवा वयामुळे काहीच करत नसलेल्यांना प्रेरणादायी ठरू शकतो. तर हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.