Viral Video : एकाने गिटार अन् दुसऱ्याने घशातून लावला सूर; मेट्रोतील पोरी लाजून लाजून चूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Singing

Viral Video : एकाने गिटार अन् दुसऱ्याने घशातून लावला सूर; मेट्रोतील पोरी लाजून लाजून चूर

सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. तर अनेकदा विनोदी डान्स, गाण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. लग्नातील डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. सध्या दोन मुलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यातील एकजण मेट्रोमध्ये एक गाणं गाताना दिसत आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मेट्रो प्रवासातील असून त्यामध्ये एक युवक गाणं गाताना दिसत आहे. तर एक मुलगा गिटार वाजवताना दिसत आहे. त्याच्या गाण्याला मेट्रोतील प्रवासी दाद देताना दिसत आहेत तर या युवकाने मेट्रोमध्ये त्याच्या गायनाने माहोल बनवला आहे. त्याचा हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, फेसबुकवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला सध्या चांगलीच पसंती मिळत असून त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :Metrovideo viralOld Songs