
Rajnath Mango: पाकिस्तानविरोधात भारत सरकारनं केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईमुळं प्रभावित झालेल्या पद्मश्री हाजी कलिमुल्ला यांनी एक अनोखी गोष्ट केली आहे. त्यांनी आपल्या आंब्याच्या बागेमध्ये एक खास प्रजातीचा आंबा विकसित केला आहे. या आंब्याचं त्यांनी 'राजनाथ आंबा असं नामकरणही केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नावावरुन हे नाव त्यांनी दिलं असून त्यांचं काम चांगलं असल्याची पुस्तीही यावेळी कलिमुल्ला यांनी जोडली आहे. त्याचबरोबर या विशेष आंब्याची खासियतही त्यांनी सांगितली.