Pakistan Crisis : पिठासाठी पाकिस्तानी जनता रस्त्यावर अन् मोदींचा 'तो' Video Viral

पाकिस्तानातील अनेक प्रांतात पीठ मिळवण्यासाठी लोकांनी लांबच लांब रांगाही लावलेल्या आहेत.
Pakistan Crisis
Pakistan CrisisSakal

भारत-पाकिस्तान, सख्खे शेजारी पण पक्के वैरी... आपला भारत हा विकसनशील देश तर पाकिस्तान म्हणजे अगदी गरिबीत अन् जगभरातील देशांच्या भीकेवर जगणारा देश. पण आता याच पाकिस्तानात आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक क्लिप तुफान व्हायरल झाली आहे.

तर, झालं असं की सध्या पाकिस्तानात महागाईनं उच्चांक गाठला आहे. गहू, तांदूळ, मीठासह सर्व जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. त्यात गव्हाचं पीठ हे तब्बल १६० रु. किलो, मीठ ६० रु. किलो दरानं मिळतंय. सिंध प्रांतात तर पीठाचं एक पाकिट मिळवण्यासाठी लोकं आपापसात भांडताना दिसताहेत. तर, पाकिस्तानातील अनेक प्रांतात पीठ मिळवण्यासाठी लोकांनी लांबच लांब रांगाही लावलेल्या आहेत.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

एकीकडे पाकिस्तानातले लोक पीठासाठी भांडत असताना त्यांचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नुकताच यूएई दौरा केला. या दौऱ्यावेळी यूएईनं पाकिस्तानातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी १ अरब डॉलरचं अर्थसहाय्य करण्याची घोषणा केली. ज्याला पाकिस्तानच्या विदेशनीतीचं यशस्वी पाऊल मानलं जातंय.

खरंतर आधीच कर्जाच्या बोज्याखाली असलेल्या पाकिस्तानला पुन्हा जगासमोर हात पसरावे लागताहेत. पण एक गोष्ट आहे की याची सुरुवात खरं तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती. तेही सौदी अरेबिया, यूएईसह इतर देशांकडे जाऊन पाकिस्तानच्या मदतीसाठी हात पसरायचे. त्यांच्या याच भूमिकेवर टीका करुन सत्तेत आलेले शहबाज शरीफही आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती करताना दिसताहेत.

पाकिस्तानातील महागाई आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्यांनीही नुकत्याच केलेल्या दौऱ्यात यूएईसमोर हात पसरले आणि अरब डॉलरची मदत मिळवली. याच धर्तीवर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या पक्षातील नेते मोदींच्या जुन्या भाषणाची क्लिप वापरुन विद्यमान सरकार शहबाज शरीफ यांच्यावर निशाणा साधताहेत. त्यासाठी इमरान खान यांच्या पक्षातील नेते मोदींच्या २०१९ सालातील भाषणाची क्लिप पाकिस्तानात व्हायरल करताहेत. आता या क्लिपमध्ये नेमकं काय आहे, ते तुम्हीच पाहा

(व्हिडिओ 33.31 ते 34.55 मिनीटे या दरम्यान पाहा)

त्यामुळे खरं मोदींनी म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानचे पंतप्रधान खरंच झोळी पसरवून त्यांच्या शेजारी मित्रराष्ट्रांकडे जाताहेत. अन् पाकिस्तानातील आताची ढासळलेली परिस्थिती पाहता अनेक देश पाकिस्तानला अर्थसहाय्य करण्याची तयारीही दाखवताहेत. पण पाकिस्तानला मिळालेली मदत ही खरंच जनतेपर्यंत पोहचते की पाकिस्तानची भ्रष्ट सेना आणि त्यातील अधिकारी आपलेच खिसे भरतील? हा प्रश्न कायमच आहे. त्यामुळे कर्ज घेऊन न्युक्लिअर शक्ती बनवून विनाशाच्या मार्गाचा स्वीकार करणाऱ्या पाकिस्तानी सरकारचं डोकं आतातरी ठिकाणावर येईल का? हे पाहणं गरजेचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com