Palwal Shocker: Couple Beaten & Filmed Naked : ज्या महिलेने कठीण प्रसंगी मदत केली, त्या महिलेने दाम्पत्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नाही, तिने त्यांचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ बनवून त्यांच्याकडून १० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. हरियाणातील पलवल जिल्ह्यात ही घटना घडली असून, दाम्पत्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.