

Cab Driver Passenger Argument
Sakal
Cab Driver Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये कॅब ड्रायव्हर आणि एका महिला प्रवाशामध्ये वाद होत असल्याचे दिसून येते. व्हिडिओची सुरुवात दोन महिला कॅबमध्ये बसताना होते. ड्रायव्हर पुढच्या सीटवर बसलेल्या महिलेला ओटीपी मागतो, जो सुरुवातीला चुकीचा असतो. नंतर, योग्य ओटीपी मिळतो. त्यानंतर ड्रायव्हर शांतपणे महिलेला सीटबेल्ट बांधण्यास सांगतो. ती उत्तर देते, "मी करेन, तु गाडी चालव, ड्रायव्हर म्हणतो की तो सीटबेल्ट न लावता गाडी पुढे नेणार नाही कारण ट्रॅफिक पोलिस जवळच आहेत.