
Women Health: विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी काही गोष्टींचे निदान अजून विज्ञानालाही उमगले नाही. त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या अनेकांना आहे तशा स्वीकाराव्या लागतात. मासिक पाळी आणि तिच्याशी निगडित काही समस्या अशा आहेत की त्या तुम्हालाही आश्चर्याचा धक्का पोहोचवतील. होय! अशाच काहीशा समस्यांनी ग्रासलेल्या महिलेची एकावं ते नवल अशी ही गोष्ट.
मासिक पाळीमध्ये होणारा त्रास, अनियमित पाळी, पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव अशा अनेक समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते. यातील काही समस्यांवर समाजात उघडपणे बोललंही जातंय. मात्र तरी याच समाजाकडून महिलांच्या काही समस्यांची खिल्ली उडवली जाते. नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पुढे आला होता. ज्यामध्ये एक महिलेने दाढी- मिशी वाढवल्याचं दिसून येतं. हा फोटो बघताच नेटकऱ्यांनी या महिलेची मस्करी केली. काहींनी तर हा काय विचित्र प्रकार आहे म्हणत तिच्यावर प्रश्न चिन्हही उपस्थित केले. मात्र जेव्हा खरं काय ते समोर आलं तेव्हा मात्र अनेकांना खडबडून जाग आली.
देशविदेशात आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत असणारी ही महिला बकिंघमशेअरच्या Aylesbury मधील आहे. तिचे नाव Annette असे आहे. PCOSच्या त्रासामुळे तिच्या चेहऱ्यावरील केसांची सतत वाढ होते. तिची हीच समस्या तिने जगापुढे मांडत एका स्थानिक पबमध्ये दाढीमिशा कापल्या आणि त्यातून मिळालेला £2,000 इतका निधी गोळा करत तिने तो समाजकल्याणाच्या कामांसाठी दिला. तसेच PCOS च्या त्रासाविषयी जनजागृतीही केली. आता PCOS म्हणजे नेमकं काय असाही प्रश्न तुम्हाला यावेळी पडला असेल. जाणून घ्या.
PCOS म्हणजे काय?
पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम हा महिलांच्या अंडाशयाशी संबंधित एक आजार आहे. गेल्या काही दिवसांपासून या त्रासाने अनेक महिला त्रस्त आहेत. यामध्ये महिलांच्या शरीरात फीमेल हार्मोनऐवजी मेल हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. आणि या समस्या दीर्घकाळ चालणाऱ्या असतात.
मूल न होणं, गर्भावस्थेतील अडचणी, टाइप- 2 डायबिटीज (diabetes), हायपरटेंशन (hypertension), कार्डियोवॅस्कुलर डिसऑर्डर अशा व्याधींमुळे PCOS च्या समस्या उद्भवतात. निरीक्षणांनुसार स्थुलतेनं त्रस्त महिला आणि PCOS पीडित महिलांमध्ये नैराश्य आणि मानसिक आजारांचंही प्रमाण चिंताजनक असल्याचं दिसून येतं. त्यामुळं या स्थितीवरून कोणत्याही महिलेची खिल्ली उडवण्यापूर्वी परिस्थितीची पूर्ण माहिती करुन घ्या, तेच उत्तम ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.