Health Tips : फ्लू शॉट्स घेतल्याने हृदयविकाराचा धोका होणार कमी; पहा काय म्हणतंय संशोधन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Tips

Health Tips : फ्लू शॉट्स घेतल्याने हृदयविकाराचा धोका होणार कमी; पहा काय म्हणतंय संशोधन!

वातावरणातील बदलामुळे पावसाळा हिवाळ्यात तापाची साथ येतेच. त्यावेळी ताप कमी येण्यासाठी फ्लू शॉट्स देतात. त्याने व्हायरल आजार दूर होतो. पण, एका नव्या संशोधनानुसार ही लस केवळ खोकला, सर्दी आणि फ्लूपासून आपले संरक्षण करू शकत नाही. तर त्यामुळे स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो. एका संशोधनाच्या प्रसिद्धीनंतर ही माहिती समोर आली आहे. 

प्रसिद्ध जर्नल मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानूसार अमेरिकन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीच्या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, वर्षातून एकदा फ्लू शॉट्स घेतल्याने लोकांमध्ये स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो. पण, ही लस स्ट्रोकला पूर्णपणे रोखू शकते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा: Diwali Recipe: दिवाळी स्पेशल इंस्टन मैदा चकली कशी तयार करावी?

संशोधक काय म्हणतात?

स्पेनमधील अल्काला विद्यापीठातील संशोधक फ्रान्सिस्को जे. डी अबाजो यांनी सांगितले की, फ्लूमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. पण नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की फ्लू शॉट्स दिल्याने स्ट्रोकचा धोका कमी होतो. 

हेही वाचा: Healthy Lifestyle: रात्री उशिरा जेवल्याने खरंच वजन वाढतं?

फ्लू आणि हृदयविकाराचा झटका यांचा काय संबंध आहे?

फ्लू हा नाक, घसा आणि फुफ्फुसांचा संसर्गजन्य विषाणूजन्य संसर्ग आहे. तुम्हाला हृदयविकाराचा त्रास असल्यास, फ्लूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाय करणे महत्त्वाचे आहे. कारण फ्लूमुळे हृदयविकार असलेल्या लोकांचा त्रास वाढण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे फ्लू शॉट्स तो धोका कमी करते. 

हेही वाचा: Health: शरीरातील Toxins घालवण्यासाठी एक तासात किती पाणी प्यावे? एक्सपर्ट सांगतात फॉर्मूला

हृदयाच्या रुग्णांनी फ्लू शॉट का घ्यावा?

हृदयविकाराचा त्रास असलेल्या रूग्णाला फ्लू झाल्यास अधिक त्रास होण्याची शक्यता असते. अधिक गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. हृदयाच्या रुग्णांना फ्लू झाल्यास त्यांना न्यूमोनिया, ब्राँकायटिस, फुफ्फुस निकामी होणे, हृदय अपयश, मधुमेह, दमा इत्यादी विकार होऊ शकतात. त्यामुळे रूग्णाची प्रकृती अधिकच बिघडू शकते.