

Protest leader drenched in petrol catches fire after a worker ignites him during a chaotic demonstration.
esakal
अनेक सामाजिक कार्यकर्ते किंवा राजकीय नेते लोकांच्या समस्या सोडविण्साठी प्रामाणिकपणे काम करत असतात. पण काही राजकीय नेते फक्त प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करु करुन लोकांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करतात. त्यांच्या भोवती जनता आणि कार्यकर्तांचा मेळा जमतो पण कधी कधी हे स्टंट या नेत्यांच्या चांगलेच अंगलट येतात. असाच काही प्रकार घडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेता स्टंट करायला गेला, त्याला वाटले की, कार्यकर्ते त्याला वाचवतील पण झालं उलटंच.