PM Modi Fake Message
esakal
दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक नागरिकाला ८ हजार रुपये देणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, हा मेसेज पूर्णपणे बनावट असून त्यामागे सायबर भामट्यांचा डाव आहे. या आमिषाचा वापर करून नागरिकांचे व्हॉट्सॲप अकाउंट आणि मोबाईलचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अहमदाबाद सिटी सायबर क्राइम पोलिसांनी याबाबत नागरिकांना सतर्क केलं असून अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचं आवाहन केलं आहे.