
बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील एका गावात घडलेल्या अनोख्या कौटुंबिक नाट्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका महिलेने आपल्या पतीला सोडून आपल्या दाजीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली, तर तिच्या पतीने तिच्या बहिणीला अर्थात आपल्या मेव्हणीला एक विचित्र ‘एक्सचेंज ऑफर’ दिली. ही कहाणी ऐकून तुम्हालाही 2001 मधील ‘अजनबी’ चित्रपटाची आठवण होईल, पण हा प्रसंग खऱ्या आयुष्यातील आहे आणि त्यामुळे गावात चर्चांना उधाण आले आहे.