

Pune Software Engineers Become Rapido Bike Taxi Riders
आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांचे आयुष्य म्हणजे ऑफिस, लॅपटॉप, टार्गेट्स आणि डेडलाईन्स, असे चित्र अनेकदा पाहायला मिळते. मात्र, पुण्यातील दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची एक वेगळीच कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. महिन्याला एक लाख रुपयांपेक्षा अधिक पगार मिळत असतानाही हे दोघे तरुण वीकेंडला चक्क रॅपिडो बाईक टॅक्सी चालवत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी काही तासांत केलेली कमाई आणि त्यामागचे कारण ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.