
राज्यात सक्तीच्या हिंदीवरुन मनसेसह अनेक पक्ष आक्रमक झाल्यानंतर या मराठी-हिंदी वाद चांगलाच पेटला असून प्रसिद्ध गुंतवणुकदार सुशील केडिया यांनी मराठी बोलण्यास नकार देत राज ठाकरे यांना आव्हान दिले असतानाच पुण्यात एका परप्रांतीय महिलेचाही मराठी बोलण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक महिलेला मराठी भाषेत बोलण्यास सांगत असल्याचे दिसत आहे. यावर ती महिला म्हणते की ती फक्त हिंदीत बोलेल. यानंतर तिथे वाद वाढतो.