Viral Video : अजगराला खायला चालला होता; सिंहावर केला जबरी हल्ला अन् क्षणात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : खायला चालला होता; अजगराने सिंहावर केला हल्ला अन् क्षणात...

अजगर किंवा साप बघितला तर आपल्या अंगावर काटा येतो. तर समोरासमोर पाहिला तर आपली पळता भुई थोडी होते. दरम्यान अनेकदा साप आणि मुंगूस यांच्यामध्ये हल्ला झाल्याच्या घटना पाहिल्या असतील. पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये चक्क अजगर सिंहावर जोरदार हल्ला करताना दिसत आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा जंगलातील असून त्यामध्ये सिंह एका अजगरावर हल्ला करताना दिसत आहे. सिंह हळूहळू समोर जात असताना अजगराने सिंहावर प्रतीहल्ला करताना सिंहाच्या तोंडाला चावा घेतला आहे. सापाची आक्रमकता येवढी होती की त्याच्या चपळतेपुढे सिंहही फिका पडला.

दरम्यान, सिंहाच्या तोंडावर अजगराने केलेला हल्ला पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला सध्या नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून एक हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.

टॅग्स :pythonlionviral video