Radhika Merchant: मामेरू सोहळ्यात नखशिखांत नटलेल्या अंबानींच्या सुनेने का घातले जूने दागिने? आहे महत्त्वाचं कारण

मामेरू सोहळ्यात नखशिखांत नटलेल्या अंबानींच्या या होणाऱ्या सुनेने जुने दागिने परिधान केल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.
radhika merchant wears her mother jewellery in mameru ceremony
radhika merchant wears her mother jewellery in mameru ceremonyPradnyesh Otari

लवकरच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, लग्नापूर्वीच्या सोहळ्याला काल पासून सुरुवात झाली आहे. काल रात्री अंबानी यांच्या घरी गुजरातमधील फेमस पारंपारिक कार्यक्रम ‘मामेरू’ पार पडला. या कार्यक्रमाला वनतारा थीमने सजलेल्या रथावरून अनंत-राधिकाची एन्ट्री पाहायला मिळाली. पण सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे या कार्यक्रमावेळी राधिकाने घातलेल्या दागिन्याची. मामेरू सोहळ्यात नखशिखांत नटलेल्या अंबानींच्या या होणाऱ्या सुनेने जुने दागिने परिधान केल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. (radhika merchant wears her mother jewellery in mameru ceremony)

‘मामेरू’ कार्यक्रमासाठी अनंत-राधिकाने खास लूक केला होता. राधिकाने गुलाबी आणि नारंगी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता; ज्यावर सोन्याच्या जरीने वर्क केलं होतं. तर अनंत यांनी राधिकाला मॅचिंग असा कुर्ता आणि त्यावर जॅकेट घातले होते. या कार्यक्रमासाठी राधिकाने प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला सुंदर लेहेंगा पहिधान केला होता. तिच्या या लेहेंग्याची चर्चा सुरु असतानाच तिनं परिधान केलेल्या दागिन्याची चर्चा सुरु आहे.

radhika merchant wears her mother jewellery in mameru ceremony
Radhika Merchant: मामेरू सोहळ्यात राधिका मर्चंट नटली गुजराती लुकमध्ये, पण हे मामेरू म्हणजे नक्की काय?

मिळालेल्या माहितीनुसार, राधिकाने तिची आई शैला मर्चंट यांचे दागिने परिधान केले होते. हा तो दागिना आहे जेव्हा तिच्या आईने स्वतःच्या मामेरु कार्यक्रमात घातला होता.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वी अंबानी कुटुंबाने ५० गरीब जोडप्यांच्या लग्नाचं आयोजन केलं होतं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी मंगळवारी पालघरमध्ये ५० गरीब मुलींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. यापूर्वी, अनंत आणि राधिका यांनी 19 जानेवारी 2023 रोजी मुंबईत गोल धना परंपरेनुसार साखरपुडा केला. त्यानंतर मार्च महिन्यात जामनगरमध्ये तीन दिवसीय प्री-वेडिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com