
Rahul Gandhi : एकनाथ शिंदेंनंतर राहुल गांधीचाही डुप्लीकेट; दोघेही आले एकत्र
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा हुबेहुब दिसणाऱ्या पुण्यातील एका व्यक्तीने चांगलीच हवा केली होती. गणपती आणि नवरात्रीच्या काळात त्याला आरतीसाठी बोलावले जात आहे. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या डुप्लीकेट व्यक्तीचीही आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
राहुल गांधी यांचा डुप्लीकेट राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाला आहे. त्याने राहुल गांधी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला असून त्या फोटोमध्ये ते दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन चाललेले दिसत आहेत. तर फैजल चौधरी असं या व्यक्तीचं नाव आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्यासारखा दिसणारा फैजल चौधरी हा मध्यप्रदेश येथील मेरठमधील रहिवाशी आहे. तो काँग्रेसचा कार्यकर्ता असून तो हुबेहूब राहुल गांधी यांच्यासारखा दिसतो. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर अनेकांनी त्या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.