
Rahul Gandhi सुसाट; काश्मिरातील बर्फावर घेतला स्की रनचा आनंद, Viral Video
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नुकतीच संपली आहे. काश्मिरातील श्रीनगर येथे त्यांच्या यात्रेचा समारोप झाला होता. त्यावेळी त्यांनी बर्फाळ प्रदेशात आनंद लुटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर आता त्यांचा बर्फावरून स्की रन खेळ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा - वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...
राहुल गांधी हे सध्या सुट्टीवर आहेत. ते काश्मिरातील गुलमर्ग येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले असून त्यांनी स्कीन स्लोप या खेळाचा आनंद घेतला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे कोच असून त्यांनीच हा व्हिडिओ शूट केला आहे. ते राहुल गांधी यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. तर त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या भाषणात हिमवादळात भाषण केले होते. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर लगेच काही दिवसांत ते आपली सुट्टी साजरी करण्यासाठी गेले आहेत. फरहत नाईक यांनी आपल्या ट्वीटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.