

Raigad Fort
esakal
सध्या सोशल मीडियावर एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रायगड किल्ल्याची काल्पनिक पुनर्रचना (reconstruction) दाखवतो. सध्याच्या रखडलेल्या आणि पडझड झालेल्या रायगडापेक्षा कितीतरी पट भव्य, वैभवशाली आणि अभेद्य असलेला तो रायगड पाहून शिवभक्तांच्या डोळ्यांत पाणी तर आलेच, पण मनातही अभिमानाची लहर उसळली आहे.