
जस्थानमधील एका शेतकऱ्याला 30 वर्षांनंतर दृष्टी प्राप्त झाली आहे. पालीमधील शेतकरी अकबर कठात यांची वयाच्या २५ व्या वर्षी खोकल्याने शेतात काम करताना अचानक दृष्टी गेली. ३० वर्षे अंधारमय जीवन जगणाऱ्या अकबर यांना त्यांच्या मुलाचे लग्नही पाहता आले नाही. त्यांच्या एक वर्षाच्या नातवाचा चेहरा पाहण्याची आस असलेल्या या शेतकऱ्याला वयाच्या ६१ व्या वर्षी पुन्हा दृष्टी मिळाली. यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.