

A drunk young man allegedly sets his own two-wheeler on fire and sleeps on the road near Ranjangaon, causing traffic disruption
esakal
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपूंजी परिसरात दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणाने स्वतःचीच दुचाकी भर रस्त्यात पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीला आग लावल्यानंतर हा तरुण रस्त्यावरच झोपल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या प्रकारामुळे संबंधित रस्त्यावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, तो सध्या चर्चेत आहे.