

A tragic moment captured at Chinchakhari cricket ground in Ratnagiri where a player collapsed during a match after suffering a sudden heart attack.
esakal
Player Suffers Fatal Heart Attack During Cricket Match : हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामध्ये अगदी मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती आढळून आले आहेत. विशेष म्हणजे शारिरीकदृष्ट्या तंदुरस्त असणाऱ्यांनाही हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आलेले आहे.
अशी एक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिंचखारी येथे घडल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी एका लाईव्ह क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूला मैदानावर खेळत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो तिथेच कोसळला व त्याचा मृत्यू झाला. या घटनेने उपस्थित असलेले सर्वजण हादरले. मृत खेळाडूचे नाव प्रवीण पवार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरी जिल्ह्यातील चिंचखारी येथे स्वराज प्रतिष्ठान आणि कोकण नगर संघांमध्ये हा क्रिकेट सामना सुरू होता. स्वराज प्रतिष्ठान संघ फलंदाजी करत असताना मैदानावर असलेल्या त्यांच्या एका फलंदाजाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. सामना थेट प्रक्षेपित होत असताना ही घटना घडली.
या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये प्रवीण पवार नॉन-स्ट्राइक एंडवर उभा असल्याचे दिसून आले आहे, तर पार्थ नावाचा दुसरा खेळाडू स्ट्राइकवर होता. दोघेही स्वराज प्रतिष्ठान संघाकडून फलंदाजी करत होते. सामन्यादरम्यान, नॉन-स्ट्राइक एंडवर असलेला प्रवीण चेंडू टाकल्यानंतर काही अंतर धावत परतत होता, तेवढ्यात तो अचानक पंचांच्या जवळ जाताच अडखळला आणि जमिनीवर कोसळला आणि त्याचा मैदानावरच मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.