

Indian Boy Viral Truth
esakal
Germany Viral Indian Youth : कोणाचं नशिब कुठे फिरेल याचा काही नेम नाही. सोशल मीडियामुळे अनेकजण रात्रीतून फेमस होतात अन् रात्रीतून पूर्णपणे संपलेलं आपण पाहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. भारतीय मुलगा जर्मन मेट्रोमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत बसला आहे जिला तो ओळखत नाही. तो भारतीय मुलगा हा नशिबाचा खेळ आहे. या फोटोमध्ये, हा त्रासलेला, व्यथित आणि उदासीन दिसणारा मुलगा आणि अभिनेत्रीचा फोटो संपूर्ण जर्मनीमध्ये वेगाने व्हायरल होत आहे.
प्रसिद्ध जर्मन मासिक "डेर स्पीगल" ने फोटोतील भारतीय तरुणाचा शोध सुरू केला. अखेर शोध म्युनिकमध्ये संपला, यामध्ये तो भारतीय तरुण जर्मनीमध्ये बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती समोर आली आहे.